maharashtra

पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनी प्रकरणी जलसमर्पण करण्याचा इशारा


उरमोडी जलाशयाची उभारणी करताना पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनीच्या रेकॉर्डवर माझ्या नावाची नोंद होत नाही. उलट ती जमीन शासनाने तारळी प्रकल्पासाठी दुबार संपादित केल्याने झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी माझ्या कुटुंबासह दि.२६ जानेवारी रोजी उरमोडी जलाशयात कुटुंबीयांसह जलसमर्पण करणार असल्याचा इशारा आष्टे, ता. सातारा येथील श्रीरंग ढगे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना एका निवेदनाद्वारे दिला.

सातारा : उरमोडी जलाशयाची उभारणी करताना पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनीच्या रेकॉर्डवर माझ्या नावाची नोंद होत नाही. उलट ती जमीन शासनाने तारळी प्रकल्पासाठी दुबार संपादित केल्याने झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी माझ्या कुटुंबासह दि.२६ जानेवारी रोजी उरमोडी जलाशयात कुटुंबीयांसह जलसमर्पण करणार असल्याचा इशारा आष्टे, ता. सातारा येथील श्रीरंग ढगे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना एका निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हंटले आहे, परळी, ता. सातारा नजीक उरमोडी जलाशयाची निर्मिती करताना माझे शेत आणि घर त्यामध्ये गेले. शासनाने आम्हाला सन १९९९ मध्ये सासपडे, ता. सातारा येथे संपादित केलेली जमीन दिली. मात्र ती पडीक असल्यामुळे तिच्यावर सुमारे ८ ते ९ लाख रुपये खर्च केले. त्या जमिनीला पाण्याची व्यवस्था केली. असे असताना त्या जमिनीच्या रेकॉर्डवर माझ्या नावाची नोंद होत नाही. दरम्यान, सन २०१७ साली शासनाने तारळी प्रकल्पासाठी तीच जमीन दुबार संपादित केली. याबाबत गेली पाच वर्षे मी शासन दरबारी न्याय मागत असताना त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे दि.२६ जानेवारी रोजी मी कुटुंबासह उरमोडी जलाशयात जलसमर्पण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.