शाहूपुरीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, व्हॉल्व लिकेजचे कारण सातत्याने पुढे करत अनियमित, अपुरा, विस्कळीत पाणीपुवठा केला जातो.
सातारा : शाहूपुरीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, व्हॉल्व लिकेजचे कारण सातत्याने पुढे करत अनियमित, अपुरा, विस्कळीत पाणीपुवठा केला जातो. ही समस्या दूर करावी, अन्यथा शाहूपुरीवासीय तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता यांना शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले व सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात नमूद केले आहे की, गेले अनेक दिवस शाहूपुरी अंतर्गत होणारा पाणीपुरवठा हा सातत्याने एअर व्हॉल्व लिकेजमुळे वारंवार विस्कळीत होत आहे. या बाबी अचानक होत असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एअर व्हॉल्व लिकेजचा प्रश्न हा वारंवार निर्माण होत आहे. या प्रश्नाकडे प्राधिकरण गांभीर्याने पाहत नाही.
यापुढे ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर शाहूपुरीवासीयांना जीवन प्राधिकरणाचा बेजबाबदार कारभाराविरोधात आंदोलनाची जाहीर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही भारत भोसले यांनी दिला. दरम्यान, कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करुन पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले.


