महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकीला अडकवलेली ५० हजार असलेली बॅग चोरीस

फलटण शहरातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फलटण राजवाडा शाखेसमोर एक अज्ञात व्यक्तीने पाठीमागे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणून दिशाभूल करून पडलेले पैसे उचलत असताना मोटार सायकल हँण्डलला अडकविलेली 50 हजार रुपये रक्कम असलेली पैशांची पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शेतकऱ्यास धमकी देणाऱ्या कोळकीतील खासगी सावकारास अटक

निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे साडेतीन लाख घेऊनही सोळा लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांतील सहाजण तडीपार

जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील सहा जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी ही कारवाई केली असून नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.

esahas.com
महाराष्ट्र

ठाणे येथील महिलेचा महाबळेश्वरमध्ये मृत्यू

महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटक महिलेचा गुरुवारी अकस्मात मृत्यू  झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आज सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक शिवराज सणस यांनी दिली. सुचित्रा अविनाश गोगर (वय ४५, रा. ठाकुर्ली, ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ

राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले.

esahas.com
महाराष्ट्र

मोहन मस्कर- पाटील यांना साश्रूनयनांनी निरोप

साताऱ्याच्या पत्रकारितेत स्वत:चे अनोखे वलय निर्माण केलेल्या पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदविकाराच्या  तीव्र झटक्याने गुरुवारी दुपारी निधन झाले. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी या 'अक्षरक्रांती', 'पत्रयोद्ध्या'ला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, रक्षाविसर्जन विधी सोमवारी (दि. ३१) सकाळी ९.३० वाजता चिंचेवाडी येथे होणार आहे.

esahas.com
महाराष्ट्र

करवडीत जमिन हद्दीच्या वादातून एकास मारहाण

करवडी, ता. कराड येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केली. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद विकास तानाजी पिसाळ (वय 45) रा. करवडी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

तब्बल अडीच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले पत्रकार मोहन मस्कर- पाटील (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला.

esahas.com
महाराष्ट्र

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचारसारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.

esahas.com
महाराष्ट्र

मलकापूरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिमेस प्रारंभ

मलकापूर शहरात दोन-तीन वर्षांपासून नागरिकांकडून भटकी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मागणी होत होती. त्यानुसार पालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यास प्रारंभ केला असून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 5 MLD STP प्लॅट याठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला.