जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी २ हजार ५५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी
२ हजार ५५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत मालखेड फाटा येथील पानटपरीच्या आडोशाला गणेश भास्कर पाटील, रा. काले, ता. कराड हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून १ हजार ३० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. दुसऱ्या घटनेत जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत संजय उर्फ सुरज धनाजी भिसे, रा. डी. पी. भोसले कॉलेजच्या पाठीमागे, कोरेगाव हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून १ हजार २५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


