मालगाव, ता. सातारा परिसरात पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून ८४० रुपये किमतीच्या १४ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : मालगाव, ता. सातारा परिसरात पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून ८४० रुपये किमतीच्या १४ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मालगाव गावच्या हद्दीत शिवतर ते राऊतवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत माळाच्या पुलाजवळ सचिन मोतीलाल माने, रा. मानेवस्ती, लिंब, ता. सातारा हा देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ८४० रुपये किमतीच्या १४ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.


