सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी २ हजार ५५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
मालगाव, ता. सातारा परिसरात पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून ८४० रुपये किमतीच्या १४ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
येथील खेड फाटा, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला ६२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ व रयत शिक्षण संस्थेचे कायदा सल्लागार म्हणून काम करत असलेले एडवोकेट के. व्ही. उर्फ केशवराव पाटील (वय ८६) यांचे आज दुपारी दीड वाजता सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
सातारा शहरात गत आठवड्यात एका खासगी सावकाराने एका छोट्या बाळास गहाण ठेवून घेतल्याच्या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील खासगी, अवैध सावकारी व्यवसाय करणार्यांविरुध्द कडक कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले होते.
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
येथील मंगळवार पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
एक वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही वाई येथे फिरताना आढळून आल्याने सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील एकावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.