एका युवकाने तरूणीचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिची अश्लिल छायाचित्रे प्रसिद्ध केल्याची घटना घडली. हे कृत्य करणाऱ्या युवकास सातारा सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल संपत बाबर (वय 26) रा. शहापूर ता. कराड असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कराड : एका युवकाने तरूणीचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिची अश्लिल छायाचित्रे प्रसिद्ध केल्याची घटना घडली. हे कृत्य करणाऱ्या युवकास सातारा सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल संपत बाबर (वय 26) रा. शहापूर ता. कराड असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित तरूणीच्या वडिलांचा मोबाईल गहाळ झाला होता. तो मोबाईल अमोल बाबर यास सापडळा. त्यांनतर त्याने त्यांच्या मोबाईलचा वापर करून मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलिग्रामवरून तरूणीचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. तसेच त्या अकाऊंटवरून अश्लील मेसेज व व्हिडिओ प्रसारीत करून तरुणीची बदनामी केली. याबाबत संबंधित तरूणीने तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यांनतर या घटनेचे गांभिर्य ओळखून सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. तसेच गुन्ह्यातील तांत्रिक माहिती प्राप्त करून संशयित आरोपी अमोल बाबर याला अटक केली. तसेच पोलिसांनी त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने पोलिसांना या गुन्ह्याची कबुली दिली.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, पोलीस उपअधीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, सहाय्यक फौजदार महेश शेटे, पोलीस हवालदार शंकर सावंत, सचिन पवार, अमित झेंडे, संदीप पाटील, काकडे यांनी केला.


