व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या सुरवडी ता.फलटण येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण : व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या सुरवडी ता.फलटण येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन दिलेली माहिती अशी, यातील आरोपी धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे (रा. सुरवडी, ता. फलटण) यांनी फिर्यादी अविनाश रघुनाथ जगताप (रा. सुरवडी, ता. फलटण) यांना जानेवारी 2011 मध्ये व्याजदराने बेकायदेशीररीत्या 70 हजार रुपये फिर्यादीच्या घरी दिले होते. त्या बदल्यात त्यांनी एक लाख 46 हजार रुपये परत दिले. व्याजाचे पैसे वेळेवर येत नसल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जानेवारी 2012 मध्ये आरोपी संतोष बाबुराव साळुंखे (रा. सुरवडी, ता. फलटण) यांच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये 12.5% व्याजाने घेतले होते त्या मोबदल्यात जानेवारी 2013 ते सन 2015 पर्यंत व्याजापोटी दोन लाख 64 हजार पाचशे रुपये त्यामधील एक लाख रुपये चेकनी दिले होते. व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ दमदाटी केली आहे. तसेच वर नमूद आरोपी यांनी फिर्यादीस तुझ्याकडे व्याजाचे पैसे राहिले आहेत, म्हणून सतत त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करत होते.
सन 2016 मध्ये फिर्यादीस पैशाची गरज होती. गावांमध्ये कोणीही त्यांना पैसे देत नव्हते. त्यावेळी या दोन्ही आरोपी यांनी फिर्यादीच्या जमीन गट नंबर 470 मधील 22 गुंठे जमीन साठेखत करून घेतली. त्यामध्ये त्यांनी सहा लाख 80 हजार रुपये दिल्याचे सांगितले. परंतु त्यांनी फिर्यादीस रोख एक लाख साठ हजार रुपये दिले व राहिलेले पाच लाख वीस हजार रुपये हे पाठीमागील 2011 व 20 12 मधील दिलेले पैसे पैकी 3 लाख 40 हजार रुपये व्याज व चालू दिलेले पैशाचे एक लाख 80 हजार अगाऊ व्याज असे पाच लाख वीस हजार रुपये व्याजापोटी घेतले. वास्तविक फिर्यादी यांनी वर नमूद दोन्ही आरोपी यांच्याकडून तीन लाख 55 हजार रुपये रोख असे व्याजाने घेतली होती. त्या बदल्यात फिर्यादी यांनी त्यांना वेळोवेळी नऊ लाख 30 हजार 500 रुपये व्याजापोटी दिली. असे असताना सुद्धा फिर्यादी अजून व्याजापोटी सहा लाख 80 हजार रुपये मागत आहेत. तसेच गेल्या पंधरा दिवसापूर्वी आरोपी हे त्याच्या घरी येऊन आत्तापर्यंत व्याजाचे पैसे द्यायचे जमत नसेल तर तू आम्हाला साठेखत करून दिलेली जमीन आमच्या नावावर करून दे, असे म्हणून दमदाटी केली. म्हणून धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे, संतोष बाबुराव साळुंखे दोन्ही राहणार सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


