पोलीस दल हे शिस्तीचे खाते. या खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा मान, सन्मान असतो. एखाद्या पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक हा त्या ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागाचा सर्वेसर्वा असतो. मात्र, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी रुजू झाल्यापासून स्मार्ट पोलिसिंग करत सर्व कर्मचाऱ्यांना एक वेगळी शिस्त व संदेशही दिला आहे.
७३ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे हस्ते जिल्हा बँकेचे ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाला. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. या दिवसापासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. भारत या दिवशी सार्वभौम प्रजासत्ताक बनला.
किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.
सामाजिक व माहीती अधिकार कार्यात काम करणाऱ्या महारुद्र तिकुंडे यांच्यासारखे लोकांची रेकी होणे हे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे लक्षण असून मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधीतांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे डॉ. दाभोलकर, पानसरे यांनी केलेल्या निवेदनाचा पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते तर असा घातपात झाला नस्ताआता पण प्रशासनाने या निवेदनास गांभीर्याने घेणेची गरज आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. याबाबत नागरिकांकडून अनेकदा पालिका व पोलिसांना निवेदने देण्यात आली. होती. त्यानुसार मलकापूर पालिका व शहर पोलीस प्रशासनाने सेवा रस्त्यांवर 'नो पार्किंग झोन' जाहीर केला असून सोमवारपासून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसही पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
वाळू, माती व मुरुम वाहतूकीसाठी तहसिलदारांना सागून परवानगी मिळवून देण्यासाठी राणंद, ता. माण येथील कोतवाल कृष्णदेव उर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय34) यांनी प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदाराने 28 डिसेंबर 2021 रोजी सांगली येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.
सातारा पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील नव्या मिळकतींना करप्रणाली लागू करण्यारोबरच विविध ५७ विषयांना मंजूरी देण्यात आली तर दोन विषय रद्द करण्यात आले.
सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत जागेच्या वाटणीवरून एकाने त्याच्या दोन मावशींवर चाकूने वार केला. सोमवारी २४ रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद शालन वसंत कांबळे (वय 55) रा. बेघर वस्ती, सैदापूर ता. कराड यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साकुर्डी, ता. कराड गावच्या हद्दीत कराड-पाटण रोडवर बेलदरे फाट्याजवळ दुचाकीला टेम्पोने धडक दिली. या अपघातात माय-लेक गंभीर जखमी झाले. रविवारी २४ रोजी ही घटना घडली.