सोनगाव सं. निंब, ता. सातारा येथे एकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात आज ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात किती महाविद्यालय सुरू झाली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
शॉर्ट टर्म कोर्स बाबत नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देणे आणि दोषी प्राचार्य मंजुश्री बोबडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रयत विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
किरपे, ता. कराड येथील राज धनंजय देवकर (वय ५) या शेतकऱ्याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये जखमी झालेल्या राज देवकरवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे.
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व योग्य मान राखण्यासाठी कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले राष्ट्रध्वज तहसिल आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणेस सुपूर्द करण्यात यावेत. हे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांवर असेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आपण केलेल्या न्याय्य मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनांसंदर्भात प्रशासनाने डोळेझाक केल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार संस्थापक- अध्यक्ष, युवा राज्य फाऊंडेशन महाराष्ट्र चे महारुद्र तिकुंडे यांनी दिला आहे.
सातारा उपनिबंधक आणि संजीवनी नागरी पतसंस्थेच्या साटेलोट्यामुळे एका कर्जदार भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा खटाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील २४ वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. असा आरोप माहेरच्या मंडळींनी केल्यानंतर सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासन व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिरगाव - जोशीविहीर मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.