महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांची फसवणूक

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात गळफास घेवून तिघांच्या आत्महत्या

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणातून तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

ईपीएफ बुडवणाऱ्या ठेकेदारांची निघतात बिले

सातारा पालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम सरसकट बनवणाऱ्या ठेकेदारांची बिले लेखा विभागाकडून सर्रास काढली जात आहेत. याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली आहे. लेखाधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने केल्याने विभागात एकच खळबळ उडाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

रामचंद्र जानकर व त्याच्या पत्नीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गर्भवती महिला महिला वनरक्षक व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर यांची आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

esahas.com
महाराष्ट्र

गुंड नंदकुमार कचरेवर गुन्हा दाखल

भ्रष्टाचाराची बातमी का लावतो? म्हणत पत्रकार सुमित चोरमले यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुंड नंदकुमार कचरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिल्या. याप्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती.

esahas.com
महाराष्ट्र

किरपेत पुन्हा ऊसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन

किरपे, ता. कराड येथील परिसरात शनिवारी पुन्हा ऊसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. परंतु, बिबट्याने या पिंजऱ्याला गुंगारा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

समस्या सोडवण्यासाठी संघटना गरजेची : सुर्यकांत पडवळ

आजी - माजी सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबियांना अनेक समस्या भेडसावत असतात. एकटा समस्या सोडवू शकत नाही. समस्या सोडवण्यासाठी संघटना गरजेची आहे. प्रशासनापुढे एक संघटना म्हणून तुम्ही उभे राहिल्यास समस्यांचे निवारण लवकर होते. संघटनेच्या ताकतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन आजी माजी सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पडवळ (आप्पा) यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

पैशांसाठी बाळाची विक्री केल्याचा प्राथमिक निष्कर्ष

खासगी सावकारीतून एका छोट्या बाळाला एका दांम्पत्याने ठेवून घेतले या प्रकाराचा पोलीस तपास सुरु आहे. याप्रकरणी फिर्यादी व संशयित आरोपींची चौकशी सुरु असून फिर्यादी महिलेने हे बाळ 15 की 30 हजार रुपयांना विकले असल्याचे तपासात समोर येत आहे. बाळ बेकायदेशीपणे ताब्यात ठेवणे हा देखील गुन्हा असून फिर्यादी व संशयित पोलीस ठाण्यात आहेत. त्यांची चौकशी सुरु असून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा

किरपे, ता. कराड येथे गुरुवारी सायंकाळी राज धनंजय देवकर या लहान चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाने आज शुक्रवारी त्याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शेतीपंप चोरीप्रकरणी एक युवक ताब्यात

पाण्यातील शेतीपंप चोरी प्रकरणी एका संशयित युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून शेती पंपासह दुचाकी असा ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. अनिकेत दिपक वाघमारे (वय १८, रा. वरुड, ता. खटाव) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.