सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील २४ वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. असा आरोप माहेरच्या मंडळींनी केल्यानंतर सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासन व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा : सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील २४ वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. असा आरोप माहेरच्या मंडळींनी केल्यानंतर सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासन व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शवविच्छेदन पुणे येथे केल्याने त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
याबाबत अतुल दत्तात्रय धुमाळ वय ४८, रा. घोरपडे पेठ, बालगुडे जिमसमोर, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जानेवारी २०१८ पासून २० जानेवारी २०२२ या कालावधीत संगम नगर येथील गोकर्णनगर येथे कृष्णा वंदन अपार्टमेंट येथे सुजाता शंकर भोळे वय २४ या विवाहित महिलेला पती शंकर काळूराम भोळे, सासू लिलाबाई काळूराम भोळे, दीर राजेंद्र काळूराम भोळे, जाउ स्वाती राजेंद्र भोळे सर्व रा. संगमनगर, सातारा यांनी माहेरून लॅब व गाडीसाठी ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी सुजाता शंकर भोळे हिला मानसिक व शारीरिक त्रास देऊन उपाशीपोटी ठेवून क्रूर वागणूक दिली. तसेच तिला मुलगी झाल्याने आणि तिने तिच्या पतीचे अनैतिक संबंध उघडकीस आणल्याने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा दि. २२ रोजी मृत्यू झाला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींवर खुनासह विविध कमलान्वये गुन्हा दाखल केला आहे.


