येथील सदर बझार परिसरामध्ये असलेल्या सेंट पॉल शाळेसमोरील इमारतीमध्ये वृध्दाने बिल्डींगमधील लोखंडी गजाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. सदरची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तरडगाव, ता. फलटण येथील दोघांवर कोयत्याने वार झाल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका अल्पवयीन मुलीला शहरातील एका पेठेमधून अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. सदरची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पळसावडे, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर याची आज वनविभागाने हकालपट्टी केल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.
सातारा शहरातील सातारा नगरपालिका हद्दवाढीमध्ये शाहूपुरीचा सहभाग झाला आहे. तसेच याठिकाणी कण्हेर धरणाचे पाणी सुद्धा येणार आहे. त्याची रंगीत तालीम तामजाई नगरात झाली असली तरी शाहूपुरीत अनधिकृत पाणी पुरवठा नळ जोडणीचे पितळ यानिमित्त उघड झाले आहे. कारवाई न करता 'घोरपडी बाई तुझी पाठ मऊ' असा कारभार होत असून त्याबाबत 'मौनीसाहेब' काहीही बोलत नसल्याची टीका होऊ लागली आहे.
खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी ही खासगी सावकार दांम्पत्याकडून दिली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करुन देखील त्या छोट्या बाळ असलेल्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या सभासदांचा कार्यकाल संपून आता 28 दिवस उलटले. प्रशासक व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे अजेंड्यावर साठ विषय ठेवण्यात आले आहेत. ही सभा 24 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कमिटी हॉल येथे होणार आहे. सातारा पालिकेच्या इतिहासात सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा आणि सर्वसाधारण सभा प्रथमच प्रशासक असताना होणार आहे.
किरपे, ता. कराड येथे बिबट्याने 5 वर्षाच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवार 20 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, मुलाच्या वडिलांनीच प्रसंगावधान दाखवून बिबट्याचा प्रतिकार करत मुलाचे प्राण वाचवले आहेत.
वाठार, ता. कराड येथे पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिली. गुरुवारी 20 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.