maharashtra

दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांची फसवणूक


Cheating on two in two different incidents
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० जानेवारी रोजी चार वाजण्याच्या दरम्यान अभिषेक शर्मा नावाच्या इसमाने आपल्या मोबाइलवरुन मुकेश शामराव पवार वय ४६, रा. श्रीकृष्ण कॉलनी, एमआयडीसी, कोडोली, सातारा यांच्या मोबाईलवर लिंक मेसेज पाठवून, लिंक क्लिक करून पवार यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक अकाउंट वरून ऑनलाइन ७४ हजार ५४१ रुपये  ट्रान्सफर करून फसवणूक केल्या प्रकरणी अभिषेक शर्मा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ुसऱ्या घटनेत दि. २० जानेवारी रोजी अज्ञात मोबाइलधारकाने प्रमोद जनार्दन बर्गे वय ५२, रा. गीत गोविंद अपार्टमेंट, गुरुवार पेठ, सातारा यांना त्यांच्या मोबाइलवर लिंक मेसेज पाठवून लिंक क्लिक करून त्यांच्या बँकेच्या खात्यावरून २८ हजार ७०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केल्यास ती तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञात मोबाइलधारकावर गुन्हा दाखल झाला आहे.