आजी - माजी सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबियांना अनेक समस्या भेडसावत असतात. एकटा समस्या सोडवू शकत नाही. समस्या सोडवण्यासाठी संघटना गरजेची आहे. प्रशासनापुढे एक संघटना म्हणून तुम्ही उभे राहिल्यास समस्यांचे निवारण लवकर होते. संघटनेच्या ताकतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन आजी माजी सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पडवळ (आप्पा) यांनी केले.
सातारा : आजी - माजी सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबियांना अनेक समस्या भेडसावत असतात. एकटा समस्या सोडवू शकत नाही. समस्या सोडवण्यासाठी संघटना गरजेची आहे. प्रशासनापुढे एक संघटना म्हणून तुम्ही उभे राहिल्यास समस्यांचे निवारण लवकर होते. संघटनेच्या ताकतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन आजी माजी सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पडवळ (आप्पा) यांनी केले.
कोंडवे, ता. सातारा येथे सैनिक फेडरेशन सातारा तालुका आणि आजी माजी सैनिक संघ कोंडवे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमीत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल येथे रूबी हॉल क्लिनिक आणि बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. रफीक इनामदार, संजय निंबाळकर, विलास जगताप, विजय जमदाडे, सचिन साबळे, सचिन पोळ, प्रवीण शिंदे, उर्मिला पवार, श्वेता जाधव, विद्या बर्गे, डॉ. संतोष यादव, डॉ. संध्या यादव, अनिता चोरगे, किरण गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुर्यकांत पडवळ पुढे म्हणाले, १९७१ साली झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धामध्ये जे सैनिक शहीद झाले, जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना शासनाने जमीन देण्याचे जाहीर केले होते. अनेक कुटुंबांना २० वर्षानंतरही ताबा मिळाला नाही. त्यामुळे आम्ही संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाशी लढा देत आहे. चिलेवाडी, ता. कोरेगाव येथील एका सैनिकाच्या कुटुंबाला जमीन मिळवून देण्यात आम्हाला यश आले. हे यश केवळ संघटनेमुळे आले. त्यामुळे संघटना खूप महत्त्वाची आहे. उर्वरित सैनिक कुटुंबियांना जमीन मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संघटना म्हणून काम करत असताना केवळ आजी- माजी सैनिकांच्या समस्या सोडवणे एवढेच आमचे काम नसून सर्वसामान्य नागरिकही आमची सामाजिक बांधिलकी आहे. संपूर्ण देशात गेल्या आठ वर्षापासून कोरोना या विषाणूने थैमान घातला आहे. दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे आणि राहणीमानामुळे हृदयविकार, शुगर यासारख्या नवीन समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्यामुळे आज सर्वसामान्य नागरिक हादरून गेले आहेत. आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन पाहायला मिळत आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केले.
प्रारंभी तालुकाध्यक्ष संजय निंबाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आजी-माजी सैनिक संघ कोंडवे यांच्यावतीने राबविलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी सैनिक फेडरेशन सातारा तालुक्याच्या सचिवपदी श्वेता जाधव, तर संघटकपदी विद्या बर्गे यांची नेमणूक करून त्यांना नेमणूक पत्र प्रदान करण्यात आले.


