maharashtra

जिल्ह्यात गळफास घेवून तिघांच्या आत्महत्या


Three commit suicide by hanging in the district
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणातून तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सातारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणातून तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी 10.15 वाजण्यापूर्वी अक्षय हिंदुराव इंगवले वय 27, रा. किडगाव, ता. सातारा याने एका पायाने अपंग असलेल्या नैराश्यातून खेडगाव गावच्या हद्दीत मसवटा नावाच्या शिवारात गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर रोहित श्रीरंग इंगवले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.
दुसर्‍या घटनेत दि. 21 रोजी सकाळी 9.30 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान ओझर्डे, ता. वाई गावच्या हद्दीत माळ नावाच्या शिवारात आंब्याच्या झाडाच्या फांदीला निलेश सतीश फरांदे वय 32, रा. ओझर्डे याने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खबर किशोर पुंडलिक जमदाडे, रा. फुलमाळा, शिरवळ, ता. खंडाळा यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली.
तिसर्‍या घटनेत दि. 21 रोजी 11.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान भुईंज, ता. वाई येथे वीज वितरण कार्यालयाच्या पाठीमागे असणार्‍या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला पोपट जनार्दन ढेडे, वय 42, रा. भुईंज याने लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर सुरेश श्रीरंग चिकणे याने भुईंज पोलिस पोलिस ठाण्यात दिली.