गर्भवती महिला महिला वनरक्षक व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर यांची आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सातारा : गर्भवती महिला महिला वनरक्षक व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर यांची आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास पळसावडे, ता. सातारा येथील वनक्षेत्र हद्दीत महिला वनरक्षक सिंधु बाजीराव सानप, वय २४, रा. गोवर्धन कॉलनी, दिव्यानगरी, सातारा व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे कर्तव्य बजावत असताना पळसावडे येथील माजी सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर हिने त्यांना शिवीगाळ, दमदाटी, करून हाताने, चप्पल, काठी व दगडाने मारहाण केली होती. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी जानकर दाम्पत्याला शिरवळ येथून अटक केली त्यांना दि. २० जानेवारी रोजी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची दि. २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर पुन्हा जानकर दाम्पत्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


