महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

युक्रेनमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळात काम करण्याची संधी द्या

शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी देश प्रथम आहे, तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खा. उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमात चोरट्यांची दिवाळी

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चोरट्यांनी दोन जणांच्या ३ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची चैन चोरून नेल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

बुध येथील विहीरीत बुडून एकाचा मृत्यू

बुध, ता. खटाव येथील बाईचा आंबा नावाच्या शिवारात अनिल सोपान जगताप (वय 52, रा. पांगरखेल, ता. खटाव) या व्यक्तीचा आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाण्यात बूडून मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद बुध व पांगरखेल येथील पोलिस पाटील रेश्मा ज्ञानेश्वर जगताप (वय 32) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथे खासगी कंपनीच्या कर्मचार्‍याला १ लाख ५६ हजाराला लुटले

येथील पोवई नाक्याजवळ आज सकाळी बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या एका खासगी कंपनीचा कर्मचारी अरुण धनराज गुजले, वय २४, रा. वेळे कामथी, ता. सातारा याला दोघांनी अडवून मारहाण केली. त्‍यांनंतर त्‍याच्या जवळील १ लाख ५६ हजार रुपये लुटले.

esahas.com
महाराष्ट्र

महागावनजीक ऊस तोड कामगाराचा कॅनॉलमध्ये पडून मृत्यू

महागाव, ता. सातारानजीक ऊस तोड कामगाराचा कॅनॉलमध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांमधुन हळहळ व्यक्त होत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी एकाला सक्तमजुरी

एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने विजय तानाजी निकम, वय ३५, रा. आर्वी, ता. कोरेगाव याला सातारा येथील विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

esahas.com
महाराष्ट्र

हद्दवाढ क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १५ कोटीची तरतूद

सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेने सातारा शहराच्या विकासासाठी शुक्रवारी 325 कोटी 51 लाख रुपयांच्या अंदाज पत्रकाला मान्यता दिली. हद्दवाढी नंतर नव्याने तयार झालेल्या क्षेत्रांच्या पायाभूत विकासासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र महसुल वाढी साठी कोणतेही विशेष प्रयत्न झाल्याचे जाणवले नाही. शहराच्या हद्दवाढी नंतरही मालमत्ता कराचे उत्पन्न 14 कोटी 50 लाख रुपये दर्शविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते.

esahas.com
महाराष्ट्र

रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार : खा. उदयनराजे भोसले

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

esahas.com
महाराष्ट्र

कराड नगरपालिका आवारात एकाकडून पालिका अधिकाऱ्यास मारहाण

येथील नगरपालिकेत माहिती अधिकारामध्ये एकाने माहिती मागवली होती. ती संबंधित अधिकाऱ्याने अर्जदारास दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणत एकाने पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत त्याला पालिकेच्या आवारात मारहाण केली. त्यामुळे संतप्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.