महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

उसने पैसे न दिल्याने एकास मारहाण

उसने पैसे न दिल्याच्या कारणातून योगेश इंदलकर याला वेण्णानगर ता. सातारा या गावच्या हद्दीत दि. २१ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी निकीता संतोष फाळके रा. शानबाग शाळेच्या मागे, दौलतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज रजपुत रा. बुधवार नाका याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाअंती निकीता फाळके हिलाच सहआरोपी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास वीस वर्ष सक्तमजुरी

कराड तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली.

esahas.com
महाराष्ट्र

बँकेच्या अधिकाऱ्यानेच लुटल्याचा बनाव करुन बँकेच्या पैशावर मारला डल्ला !

बंधन बँक लि. शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेल्या समाधान भिमराव वजाळे (वय २३, सध्या रा.स्वामी विवेकानंदनगर, फलटण) याने आपणास 4 जणांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटल्याची तक्रार मंगळवार दि.22 फेब्रुवारी ला दिली होती. मात्र तपासात तक्रारदारानेच बँकेच्या पैशावर डल्ला मारण्याची शक्कल पुढे आल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

सिमेंटची पोती घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी

सिमेंटची पोती घेऊन जाणारा आयशर टेम्पो भरतगाववाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

esahas.com
महाराष्ट्र

सराईत गुन्हेगाराकडून चोरीच्या 3 मोटार सायकली जप्त

सातार्‍यातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या 3 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ना. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

कृष्णानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

कोल्हापूर येथे खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महावितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा येथील कृष्णानगर येथे असणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या प्रवेशदाराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

esahas.com
महाराष्ट्र

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उदयनराजे यांची हवा

आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजे यांनी मोटार बाईकवर स्वार होत थेट साठ फूट उंच हवेतून स्टेजवर एन्ट्री केली. राजेंच्या या थरारक एंट्रीला सातारकरांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

esahas.com
महाराष्ट्र

खा. श्री. छ. उदयनराजेंची मोठी घोषणा

खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून त्यांनी बुधवारी जाहीर केल्यानूसार काही वेळापुर्वीच मोठ्या घोषणेतील एक घोषणा त्यांनी ट्विट करुन केली आहे. उदयनराजेंनी शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा आधुनिक पद्धतीने शालेय मुला-मुलींपर्यंत पोहोचवणारा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास त्यांनी 'मावळ्यांची शाळा' असे नमूद केले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सांडवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर

सांडवली, ता. सातारा गावच्या हद्दीत आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये गेलेल्या एकावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिताराम सखाराम मोरे, वय ६०, रा. सांडवली, ता. सातारा असे त्यांचे नाव आहे.