बुध, ता. खटाव येथील बाईचा आंबा नावाच्या शिवारात अनिल सोपान जगताप (वय 52, रा. पांगरखेल, ता. खटाव) या व्यक्तीचा आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाण्यात बूडून मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद बुध व पांगरखेल येथील पोलिस पाटील रेश्मा ज्ञानेश्वर जगताप (वय 32) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
पुसेगाव : बुध, ता. खटाव येथील बाईचा आंबा नावाच्या शिवारात अनिल सोपान जगताप (वय 52, रा. पांगरखेल, ता. खटाव) या व्यक्तीचा आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाण्यात बूडून मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद बुध व पांगरखेल येथील पोलिस पाटील रेश्मा ज्ञानेश्वर जगताप (वय 32) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बुध हद्दीतील बाईचा आंबा या शिवारातील श्रीकांत पत्की यांच्या विहीरीत अनिल जगताप यांचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. यापुर्वीही मानसिक संतुलन ढळलेले अनिल जगताप हे दोन-तीन दिवस गायब झाले होते. ते रात्रीच्यावेळी घराबाहेर फिरत असत. त्यातूनच ते विहीरीत पडून मयत झाले असावेत, अशी फिर्याद पोलिस पाटील रेश्मा जगताप यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली असून हवालदार बर्गे या घटनेचा तपास करत आहेत.


