onedrownedinawellatbudh

esahas.com

बुध येथील विहीरीत बुडून एकाचा मृत्यू

बुध, ता. खटाव येथील बाईचा आंबा नावाच्या शिवारात अनिल सोपान जगताप (वय 52, रा. पांगरखेल, ता. खटाव) या व्यक्तीचा आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाण्यात बूडून मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद बुध व पांगरखेल येथील पोलिस पाटील रेश्मा ज्ञानेश्वर जगताप (वय 32) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.