maharashtra

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


Three charged with harassing wife
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मे २०२० ते १० जानेवारी २०२२ अखेर सासरी ५०९, हॉटेल प्रिन्स पॅलेस, भिलार, ता. महाबळेश्वर तेथे तेजस्वी रोहित भिलारे, वय २९ सध्या रा. महालक्ष्मी नगर, गोरखपुर (खेड) ता. सातारा  हिला पती रोहित सुरेंद्र भिलारे, वय ३१, सासरे सुरेंद्र तुकाराम भिलारे, वय ५४, सासु रेनिता सुरेंद्र भिलारे, वय ४८ यांनी तुला त्वचेची समस्या आहे  असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच वडिलांकडुन फ्रिज, सोन्याची चैन घेऊन येण्यासह फ्लॅट खरेदी करून देण्यास सांगून तिचा जाचहाट केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.