maharashtra

अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी एकाला सक्तमजुरी


Hard labor for molesting a minor girl
एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने विजय तानाजी निकम, वय ३५, रा. आर्वी, ता. कोरेगाव याला सातारा येथील विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सातारा : एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने विजय तानाजी निकम, वय ३५, रा. आर्वी, ता. कोरेगाव याला सातारा येथील विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, २८ एप्रिल २०१८ रोजी ६ वाजण्याच्या सुमारास आर्वी,  ता. कोरेगाव गावच्या हद्दीत विजय निकम याने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अश्लील हावभाव करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. याबाबत त्या मुलीने रहिमतपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांच्याकडे झाले. त्यामध्ये ८ साक्षीदार तपासण्यात आले. ए. के. पटणी यांनी विजय निकम याला ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
अति. सरकारी वकील म्हणून नितीन मुकेश यांनी कामकाज पाहिले त्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किद्रे, पैरवी अधिकारी सुनील मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, पोलीस नाईक रिहाना शेख, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे यांनी सहकार्य केले.