maharashtra

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घाला

कुंभार समाजाची मागणी

Ban plaster of Paris idols
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे कुंभार बांधवांची मातीकला लोप पावत आहे. तरुणांकडे मातीची पारंपारिक कला अवगत असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे  कुंभार समाजाला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समाजाच्यावतीने मारुतराव कुंभार यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

सातारा : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे कुंभार बांधवांची मातीकला लोप पावत आहे. तरुणांकडे मातीची पारंपारिक कला अवगत असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे
 कुंभार समाजाला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समाजाच्यावतीने मारुतराव कुंभार यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या सर्वच मूर्ती फक्त शोभेच्या वस्तू म्हणून विकता येऊ शकतील. मात्र कोणतीही मूर्ती पूजेसाठी विकता येणार नाही. संबंधित मूर्तिकारांनी आपल्या कारखान्यात व विक्री केंद्रावर तसा फलक लावणे बंधनकारक आहे, तसे आदेश उच्च न्यायालयाचे असतानाही त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे कुंभार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित मूर्तिकारांकडून मूर्ती पूजेसाठी न विकण्याचे लेखी हमीपत्र घेण्यात यावे. 
गत वर्षापासून नागपुर औरंगाबाद मुंबई आदी ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या देवी-देवतांच्या मूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातही अशाच प्रकारे न्यायालयाच्या आदेशाची जिल्हा प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी. आमच्या मागणीवर अंमलबजावणी न झाल्यास कुंभार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. तसेच
नदीपात्र किंवा तलावातील साचलेला गाळ शाडू मातीच्या मूर्तिकारांना वापरण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.