maharashtra

उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला मारला दगड


One was stoned for asking for a loan
पानटपरीचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला दगड फेकून मारल्याने त्यात तो जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पानटपरीचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला दगड फेकून मारल्याने त्यात तो जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ रोजी ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या औद्योगिक वसाहतीमधील रिलायन्स कमुनिकेशन शेजारील मोकळ्या पटांगणात असणाऱ्या पान टपरीवर एक टक्कल पडलेला इसम आला. त्याने पानटपरी चालक राजेंद्र पुंडलिक पवार रा. माने कॉलनी, देगाव रोड, संभाजीनगर, सातारा त्याच्याकडे सिगारेटची मागणी केली. मात्र त्याला पहिली उधारी दे असे म्हणाल्याने त्याने पवार यांना दगड फेकून मारल्याने त्यात ते जखमी झाले. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.