maharashtra

अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


Both are charged with concealing their existence
धोंडेवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत फाट्याजवळ अस्तित्व लपवल्याप्रकरणी वडुज पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला.

सातारा : धोंडेवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत फाट्याजवळ अस्तित्व लपवल्याप्रकरणी वडुज पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास धोंडेवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत फाट्याजवळ रफिक हसनसा आणि सय्यद हुसेनसाब जातकर, दोघेही रा. शास्त्री चौक, मिरज, जि. सांगली हे चारचाकी वाहन आडोशाला उभे करून दिसून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांची विचारपूस केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने त्यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल संदीप शेळके यांनी वडुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोघांच्या वर अस्तित्व लपवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.