सातारा जिल्ह्यातून पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून 2 लाख 45 हजार 8500 रुपयाची देशी-विदेशी दारू हस्तगत करण्यात आली.
सातार्यात काही दिवसातच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदरच दोन्ही राजेंकडून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खोचक टीका केली. त्याच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही, असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे कुंभार बांधवांची मातीकला लोप पावत आहे. तरुणांकडे मातीची पारंपारिक कला अवगत असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे कुंभार समाजाला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समाजाच्यावतीने मारुतराव कुंभार यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
सातारा नगरपालिकेची घरपट्टी थकीत ठेवल्याने करंजे तर्फ, ता. सातारा येथील दोघांच्या मालमत्तांना आज सील लावण्यात आले. ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी थकीत घरपट्टी तात्काळ नगरपालिकेत जमा करावी असे आवाहन पालिकेच्यावतीने आज करण्यात आले.
साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले (पवार) सध्या सातारा शहर व जिल्ह्याच्या समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. श्री.छ. शाहू क्रीडा संकुलातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देत याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरु होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमींच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपले वक्तव्य करीत मागे घ्यावे, असे ट्विट खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. मात्र काही वेळातच उदयनराजे यांनी ट्विट डिलीट करून दुसरे ट्विट करून राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात उदयनराजे भोसले यांनी डिलिट केलेल्या ट्विटची चर्चा जोरात सुरू होती.
डॉ. अतुल मुळे यांचे आज दि. २७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ४९ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले.
पानटपरीचे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला दगड फेकून मारल्याने त्यात तो जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सावकारी प्रकरणी जकातवाडी येथील दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि तत्सम स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि त्याकरता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश घेण्याकरता जे शुल्क लागते त्यामध्ये सवलत देण्याचे नियोजन कैलासवासी श्रीमंत छत्रपती दादा महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.