maharashtra

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मुलाकडून वडूजमध्ये संपकऱ्यांना मदतीचा 'हात'


S. T. Employee's son lends a helping hand to contacts in Vadodara
गेली चार महिने विना वेतन असूनही वडूज एसटी आगारात एसटी कर्मचारी नेटाने राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचे विलनीकरणाच्या मागणीसाठी ठाम आहेत. त्यांना पाठिंबा व मदतीचा हात देण्यासाठी येरळवाडी, ता. खटाव येथील एस. टी. कर्मचारी गोरखनाथ चव्हाण यांचे सुपुत्र युवा नेते धनंजय चव्हाण यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असून मदतीचा हात म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

सातारा : गेली चार महिने विना वेतन असूनही वडूज एसटी आगारात एसटी कर्मचारी नेटाने राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचे विलनीकरणाच्या मागणीसाठी ठाम आहेत. त्यांना पाठिंबा व मदतीचा हात देण्यासाठी येरळवाडी, ता. खटाव येथील एस. टी. कर्मचारी गोरखनाथ चव्हाण यांचे सुपुत्र युवा नेते धनंजय चव्हाण यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असून मदतीचा हात म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
वडूज, ता. खटाव एस. टी. आगारातील आझाद मैदानात सर्व एसटी कर्मचारी आपल्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. तीस वर्षे एस. टी मध्ये सेवा करीत असताना १९९६ साली एस. टी चालक गोरखनाथ चव्हाण आजारी पडले. त्यावेळी विना वेतन असताना एस. टी. कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्थ सहाय्य केले होते. टंकसाळे यांनी त्याकाळी उधारीवर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. त्याची उतराई म्हणून  पंचवीस वर्षाने पुन्हा एकदा त्यांचे सुपुत्र धनंजय चव्हाण यांनी सुमारे बावन्न एस. टी. कर्मचाऱ्यांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
या वेळी विनायक बादल, विजयकुमार शिंदे, धनंजय चव्हाण, नामदेव पवार, दिनेश तोडकर, ज्योती लावंड, नूतन चंदनशिवे, नानासो भोसले, उत्तम खाडे, राजेंद्र पाटोळे, विजय जाधव, रुपेश गोडसे व कर्मचारी उपस्थित होते.