युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढ्याला आमचा जाहिर पाठीवा आहेच परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही निश्चितपणे आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
येथील शाहूपुरीत असणाऱ्या पेढ्याचा भैरोबा डोंगरावर आज सायंकाळी खाजगी क्षेत्रात वणवा लागला. या घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बीबी, ता. फलटण येथे दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका संशयिताला लोणंद वडगाव पोलिसांनी जेरबंद केले.
रविवार पेठ, सातारा येथील जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था गेल्या एक वर्षापासून बेकायदेशीररित्या बंद असून येथे ३५ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. पतसंस्थेचे चेअरमन विलास आंबेकर व तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्यासह चार शासकीय अधिकाऱ्यांची संगनमताने आर्थिक अनियमिततेचे प्रकरण दडपणे या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिव आराधना, रुद्रपठण, जलाभिषेक अशा पारंपारिक विधीद्वारे भाविकांनी शंभू महादेवाची आराधना केली. जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनांसाठी गर्दी केली होती.
लटणमधील उद्योजक दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कारखाना व पतसंस्था संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेत आगवणेंच्या आरोपांचे खंडण करीत आगवणे हेच मिस्टर नटवरलाल असून आगवणेंना जे मदत करीत असतील, त्यांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही खा. नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ठाणे, पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मात्र, आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे कोणत्याही तालुक्यात बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अकुंश परिहार यांनी केले आहे.
शाहूपुरी भागातील जुन्या ग्राहकांना नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कनेक्शन शिफ्टिंग करुन देत असतानाच ज्या नागरिकांना नवीन कनेक्शन हवे आहे. त्यांना ती त्वरीत देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल असा इशारा शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनास दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याबाबत आघाडीने मांडलेल्या मुद्यांशी प्राधिकरण सहमत असून याप्रश्नी आगामी काळात तातडीने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.