सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही
पशसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार : लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये
ठाणे, पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मात्र, आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे कोणत्याही तालुक्यात बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अकुंश परिहार यांनी केले आहे.
सातारा : ठाणे, पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मात्र, आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे कोणत्याही तालुक्यात बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अकुंश परिहार यांनी केले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये तसेच ठाणे, पालघर परिसरातून येत असल्या बातम्यांमुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. परिहार यांनी सांगितले की, पशवैद्यकीय विभागाकडून सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूबाबत दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यात येत असते. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील कोंबड्यांना अशा प्रकारची बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्याबाबत योग्य ती सतर्कता बाळगण्यात येत आहे.
कुकुट पालन तसेच पशु पालकांना जैवसुरक्षेचे काय काय नियम आहेत व ते कसे पाळले पाहिजेत याबाबत पशसंवर्धन आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून मार्गदर्शन केलेले आहे. पशु पालक व्यवसायिकांचे पशसंवर्धन विभागामार्फत प्रशिक्षण सत्रही आयोजित करण्यात आले होते. तालुका स्तरावर त्यासाठी खास टीम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
सध्याच्या स्थिती पशसंवर्धन विभागातर्फे जे दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यात येते. त्यामध्ये देखील जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यांमध्ये बर्ड फ्लू, किंवा बर्ड फ्लू सदृश्य आजाराची कोंबडयांना लागण झालेली नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोंबड्या, अंडी खाणाऱ्या नागरिकांनी तसेच कुकुट पालक करणाऱ्या व्यवसायिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. कोंबड्या किंवा पाहुणे पक्षी म्हणून येणाऱ्या पक्षांमध्ये अशा प्रकारे कोणतीच लागण झालेली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. परिहार यांनी केले आहे.


