maharashtra

आगवणेंना जो मदत करील, तो त्याचे परिणाम नक्कीच भोगेल

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर : आगवणेंच्या आरोपांचे खंडन

Whoever helps Aagavane will surely suffer the consequences
लटणमधील उद्योजक दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कारखाना व पतसंस्था संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेत आगवणेंच्या आरोपांचे खंडण करीत आगवणे हेच मिस्टर नटवरलाल असून आगवणेंना जे मदत करीत असतील, त्यांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही खा. नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

फलटण : फलटणमधील उद्योजक दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कारखाना व पतसंस्था संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेत आगवणेंच्या आरोपांचे खंडण करीत आगवणे हेच मिस्टर नटवरलाल असून आगवणेंना जे मदत करीत असतील, त्यांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही खा. नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी फलटण येथील उद्योजक व तालुक्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे दिगंबर आगवणे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह साखर कारखाना तसेच स्वराज पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतू आज आगवणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत स्वत:ची बाजू मांडली. त्यामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आगवणेंच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सुरवडी, ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी खा. नाईक-निंबाळकर यांनी आगवणे यांनी केलेले आरोप फेटाळत उलट आगवणे यांनीच केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, त्यांनी केलेले आरोप हे दिशाभूल करणारे आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकाना तारण ठेवलेली आहे. दिगंबर आगवणे यांना पुर्वीच्या काळामध्ये चांगल्या भावनेनेच मदत केलेली होती. दिगंबर आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल आहेत, असा पलटवार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
यापुर्वीच्या आमदारकीलाजी मते मिळाली ती फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आगवणे यांना मिळालेली आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकाना तारण ठेवलेली आहे. त्यामुळे विविध बँका अडचणीत आलेल्या आहेत. दिगंबर आगवणे यांनी विविध बँकाना यापुर्वीच फसवले आहे. दिगंबर आगवणे यांना पुर्वी जी मदत केली होती ती चांगल्या भावनेनेच मदत केलेली आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दिगंबर आगवणे यांनी जे आरोप केलेले आहेत, ते संपुर्ण बिनबुडाचे आहेत. दिगंबर आगवणे यांना जे पैसे दिलेले आहेत ते चेकने किंवा बँकेच्या द्वारेच दिलेले आहेत. आगवणे यांच्यावर जो विश्वास ठेवला तो माणुसच बोगस निघाला असल्याचे मत सुध्दा खासदार रणजितसिंह नाईक यांनी व्यक्त केले.
दिगंबर आगवणे यांना यापूर्वी स्वराज पतसंस्थेमधुन कर्ज दिलेले होते. त्यावेळी आगवणे यांना पुन्हा पैश्याची गरज भासल्याने त्यांनी पुन्हा नव्याने कर्ज काढले व त्यावेळी जुने कर्ज भरले. आगवणे यांच्या कर्जाचा कधीही हप्ता आम्ही भरलेला नव्हता व नाही, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगवणे ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेले होते त्यावेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कर्जाचा उल्लेख केलेला आहे व त्या कर्जासाठी त्यांनी तारण सुध्दा ठेवलेले होते. तर ते कर्ज बोगस कर्ज कसे होईल, असा सवालही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
दिगंबर आगवणे यांच्याकडून मला साधारण आठ कोटी येणे आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे दोन कोटी होल्ड केलेले आहेत. आठ कोटी मधुन दोन कोटी वजा करता सुमारे सहा कोटी त्यांच्याकडून येणे आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेली आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दिगंबर आगवणे यांना जो कोणी मदत करत असेल तो त्याचे परिणाम नक्कीच भोगेल. गेल्या काळामध्ये आगवणे यांना मदत केलेली होती, त्याचे परिणाम मी बघत आहे. त्यामुळे त्यांना जो कोणी मदत करत असेल तो त्याचे परिणाम नक्कीच भोगेल, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण पालिकेचे नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.