चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त : अजित बोर्हाडे
![Stolen jewelery worth Rs 7 lakh, Rs 1 lakh 80 thousand in cash handed over to plaintiff: Ajit Borrahade](https://esahas.com/upload/post/f03f72582c.jpg)
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी साहेबराव चव्हाण रा. खिंडवाडी, ता. सातारा, शोभा राजाराम कदम रा. प्रतापसिंह नगर, सातारा, इंदुबाई आप्पा काळे रा. विठ्ठलकृपा कॉलनी, देशमुख नगर, कृष्णानगर, सातारा आणि अश्विनी अरविंद उदगीर रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एन. व्ही रोड, चूनाभट्टी, मुंबई अशी मुद्देमाल परत दिलेल्यांची नावे आहेत.
अजित बोर्हाडे पुढे म्हणाले, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी गेल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले. यापूर्वीच सातारा शहर पोलिसांनी ७४ बेवारस गाड्यांचा कायदेशीर प्रक्रिया राबवून लिलाव करून २ लाख ४० हजार रुपये शासनाकडे जमा केले आहेत. रस्त्यावर केक कापणाऱ्या १६ जणांवर कारवाई केली आहे. सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कॉलेज परिसरात मारामारी करून दहशत पसरवणार्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये ट्रक, टेंपो व इतर चारचाकी वाहनांचे थकीत हप्ते भरून ती वाहने चालवण्यासाठी घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ५ कोटी रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
शिवाजी साहेबराव चव्हाण रा. खिंडवाडी, ता. सातारा, शोभा राजाराम कदम रा. प्रतापसिंह नगर, सातारा, इंदुबाई आप्पा काळे रा. विठ्ठलकृपा कॉलनी, देशमुख नगर, कृष्णानगर, सातारा आणि अश्विनी अरविंद उदगीर रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एन. व्ही रोड, चूनाभट्टी, मुंबई यांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेले होते, ते परत मिळवून त्यांना सुपूर्त करण्यात आले आहेत.या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर उपस्थित होते.