stolenjeweleryworthrs7lakhrs1lakh80thousandincashhandedovertoplaintiff:ajitborrahade

esahas.com

चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त : अजित बोर्‍हाडे

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चोरीस गेलेले ७ लाख रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीना सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.