maharashtra

पेढ्याचा भैरोबा डोंगरावर खाजगी क्षेत्रात वणवा

आटोक्यात आणण्याचे वन विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न

Vanwa on the private area of the Bhairoba hill
येथील शाहूपुरीत असणाऱ्या पेढ्याचा भैरोबा डोंगरावर आज सायंकाळी खाजगी क्षेत्रात वणवा लागला. या घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्‍न सुरू केला. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

सातारा : येथील शाहूपुरीत असणाऱ्या पेढ्याचा भैरोबा डोंगरावर आज सायंकाळी खाजगी क्षेत्रात वणवा लागला. या घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्‍न सुरू केला. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या पेढ्याचा भैरोबा या डोंगरावर आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वणवा लागला असल्याचे निदर्शनास येताच सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, कर्मचारी राज मुसलगे, पावरा, सुनील भोईटे  तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्या खाजगी क्षेत्रात वणवा लागला तेथून काही अंतरावरच वन विभागाचे क्षेत्र असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वनवा आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.