maharashtra

बीबी येथे घरफोडी करणारा संशयित जेरबंद

लोणंद आणि वडगाव पोलिसांची कामगिरी

Suspected burglar arrested at BiBi
बीबी, ता. फलटण येथे दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका संशयिताला लोणंद वडगाव पोलिसांनी जेरबंद केले.

फलटण :  बीबी, ता. फलटण येथे दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका संशयिताला लोणंद वडगाव पोलिसांनी जेरबंद केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बीबी येथे दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरफोडी करून चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घटनेतील दोन संशयित दुचाकीवरून येऊन भरदिवसा बंद असणाऱ्या घरात घरफोडी करीत असल्याचे दिसून आले.  संबंधित संशयित बीड जिल्ह्यातील असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी यातील मुख्य संशयित देविदास अभिमान काळे, वय ३४, रा. आंधळेवाडी,   ता. आष्टा,  जि. बीड हा कर्जत पोलिस ठाण्यातील दरोड्यासारख्या गुन्ह्यात फरारी असून तो साखरवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या पथकाने त्याला सापळा लावून जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक फौजदार पाडवी, मुल्ला, सपकाळ, अविनाश नलावडे, श्रीनाथ कदम, फैय्याज शेख, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, साहिल पवार आदी सहभागी झाले.