maharashtra

सत्यम नगर येथे एकाला मारहाण


One beaten at Satyam Nagar
सत्यम नगर परिसरात एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील सत्यम नगर परिसरात एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी 4 वाजता चिन्मय सुरेश मायणे, रा. ग्रामसेवक भवन जवळ, जगतापवाडी, शाहूनगर, सातारा याला अथर्व कोळपे, सेफ पट्टेवाला (नाव पत्ता समजू शकला नाही) आणि त्यांच्या दोन अनोळखी मित्रांनी काहीएक कारण नसताना बांबु व हाताने दगडाने मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.