जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 फेब्रुवारी रोजी कुरवली पाटी, ता. फलटण येथील हॉटेल शंभुच्या बाहेर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. सीएन 8727 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार यशवंत जनार्दन पाटील रा. आंदरुड, ता. फलटण यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसर्या घटनेत दि. 6 फेब्रुवारी ते दि. 7 फेब्रुवारी दरम्यान अहिरे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. 11 सिटी 1751 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार निलेश प्रकाश जमदाडे रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.


