जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोर्यांमध्ये सुमारे 81 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोर्यांमध्ये सुमारे 81 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी 5.55 वाजण्याच्या सुमारास पारगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या केसुर्डी खिंड येथील मोबाइल टॉवर इलेक्ट्रिक ट्रान्सफर खांबावरून अज्ञात चोरट्याने 45 हजार 600 रुपये किमतीची तांब्याची तार आणि ऑइल चोरून नेल्याची तक्रार विजय विश्वनाथ मोरे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसर्या घटनेत, दि.27 रोजी 4 वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील बसस्थानक आगारातून शकुंतला रघुनाथ दळवी, रा. डिस्कळ, ता. खटाव या महिलेचा एका 65 वर्षीय महिलेने ( नाव पत्ता समजू शकला नाही) विश्वास संपादन करून कमरेला असलेल्या पिशवी मधील 35 हजार 500 रुपयांच्या ऐवज चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली.


