maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One person injured in an accident
आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी अनिल हरिश्‍चंद्र गायकवाड रा. तरडगाव, ता. फलटण यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सातारा : आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीत अपघातात एकाला जखमी केल्याप्रकरणी अनिल हरिश्‍चंद्र गायकवाड रा. तरडगाव, ता. फलटण यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी रोजी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आरळे गावच्या हद्दीत अनिल हरिश्‍चंद्र गायकवाड यांनी आपल्या ताब्यातील वॅगनार कार क्रमांक एम. एच. 13 एसी 2593 रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चालवून दुचाकी क्रमांक एम. एच. 11 बीटी 6190 ला समोरून धडक दिली. या अपघातात शंकर संदे, रा. संभाजीनगर, कोडोली, ता. सातारा हे  गंभीर जखमी झाले. याबाबतची तक्रार सचिन संदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.