maharashtra

परमिट रूमसाठी बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक

काळज येथील घटना; जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेकडे लक्ष

Government fraud by submitting bogus documents for permit room
परमिट रूमसाठी बोगस कागदपत्र सादर करून एकाने शासनाची फसवणूक केली असल्याची बाब पुढे येत असून जिल्हाधिकारी शेखरसिंह याबाबत कोणती भूमिका घेतात संबंधितांवर कारवाई करतात का? याबाबत काळज, ता. फलटण येथील जनतेला उत्सुकता लागून राहिली आहे.

सातारा : परमिट रूमसाठी बोगस कागदपत्र सादर करून एकाने शासनाची फसवणूक केली असल्याची बाब पुढे येत असून जिल्हाधिकारी शेखरसिंह याबाबत कोणती भूमिका घेतात संबंधितांवर कारवाई करतात का? याबाबत काळज, ता. फलटण येथील जनतेला उत्सुकता लागून राहिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, काळज, ता. फलटण येथे परमीट रूम सुरू करण्यासाठी एका अवलियाने काळज ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांचा दारूविक्री साठी विरोध असतानाही सरपंच आणि ग्रामसेवक यांची जुनी कागदपत्रे तयार करून ती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर केली. विशेष म्हणजे सरपंच पदाचा कार्यकाल संपला असतानाही त्यांच्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे. परमिट रूम सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी बोगस कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर केली असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी शेखर सिंह कोणती भूमिका घेतात, याकडे काळज ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.