गोळीबार मैदान परिसरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सातारा : गोळीबार मैदान परिसरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
प्रियांका निलकंठ आलाटकर (वय १९) असे तिचे नाव आहे. ती ससून वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. उद्यापासून तिची परिक्षा सुरू होणार होती. त्यासाठी ती आज सायंकाळी चारला पुण्याला जाणार होती. परंतु, तत्पूर्वीच तिने गळफास लावून घेतला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.


