maharashtra

सावकारी प्रकरणी जकातवाडी येथील दोघांवर गुन्हा


Crime against two at Jakatwadi in moneylender case
सावकारी प्रकरणी जकातवाडी येथील दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सावकारी प्रकरणी जकातवाडी येथील दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  अरविंद शांताराम गायकवाड, वय ३१, रा. प्रतापसिंह नगर, सातारा यांनी जकातवाडी, ता. सातारा येथील बळवंत जाधव आणि सुर्वे मॅडम (पूर्ण नावे माहीत नाहीत) या दोघांकडुन घर बांधण्यासाठी ६६ हजार ५०० रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी जुलै २०२० ते दि. २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ८१ हजार रुपये परत देऊन सुद्धा १ लाख ३ हजार रुपये येणे असल्याचे सांगून ते वसूल करण्याकरता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली.