maharashtra

कर थकल्यामुळे करंजे तर्फ येथील दोघांच्या मालमत्ता सील


Due to tax fatigue, the property of the two was sealed at Karanje
सातारा नगरपालिकेची घरपट्टी थकीत ठेवल्याने करंजे तर्फ, ता. सातारा येथील दोघांच्या मालमत्तांना आज सील लावण्यात आले. ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी थकीत घरपट्टी तात्काळ नगरपालिकेत जमा करावी असे आवाहन पालिकेच्यावतीने आज करण्यात आले.

सातारा : सातारा नगरपालिकेची घरपट्टी थकीत ठेवल्याने करंजे तर्फ, ता. सातारा येथील दोघांच्या मालमत्तांना आज सील लावण्यात आले. ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी थकीत घरपट्टी तात्काळ नगरपालिकेत जमा करावी असे आवाहन पालिकेच्यावतीने आज करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच सातारा नगरपालिकेत पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी विशेष बैठक आयोजित करून शहरातील थकीत घरपट्टी न भरणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई करावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. करंजे तर्फ, ता. सातारा येथील अफजल बागवान यांच्याकडे १० लाख रूपये तर विजय बाबाची धनावडे यांच्याकडे २ लाख ४४ हजार रुपये घरपट्टी थकीत आहे. वारंवार सूचना करूनही ते थकीत घरपट्टी भरत नसल्याने आज त्यांच्या मालमत्तांना सील लावण्यात आले. या कारवाईत सहाय्यक कर निरीक्षक अतुल दिसले, शिपाई मिलिंद धडचिरे, राहुल आवळे यांनी सहभाग घेतला.