डॉ. अतुल मुळे यांचे आज दि. २७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ४९ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले.
पुसेसावळी : डॉ. अतुल मुळे यांचे आज दि. २७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ४९ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले.
डॉ. अतुल वामन मुळे यांनी आयुर्वेदातील (एम.डी.) पदवी संपादन केली होती. वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून ते काम पाहत होते. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या मूळगावी पुसेसावळी येथे आले होते. मात्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. सावडणे विधी मंगळवार दि. 1 मार्च रोजी होणार आहे.


