सातारा जिल्ह्यातून पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून 2 लाख 45 हजार 8500 रुपयाची देशी-विदेशी दारू हस्तगत करण्यात आली.
सातारा : सातारा जिल्ह्यातून पाच वेगवेगळ्या ठिकाणाहून 2 लाख 45 हजार 8500 रुपयाची देशी-विदेशी दारू हस्तगत करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी, ता. माण गावच्या हद्दीत बाजार पटांगण समोर रस्त्यावर प्रकाश परशुराम आंबेगिरी, धनाजी नारायण जाधव दोन्ही रा. दहिवडी यांच्याकडून 2 लाख 44 हजार 570 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. दुसर्या घटनेत मार्डी, ता. माण गावच्या हद्दीत तेथीलच सचिन जयराम जाधव यांच्याकडून 600 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
महिमानगड, ता. माण येथील लक्ष्मी वडापाव सेंटरच्या आडोशाला तेथीलच महादेव विठ्ठल जाधव याच्याकडून 600 रूपये, कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच शंकर शिवाजी चोरगे याच्याकडून 650 रुपये, लिंब, ता. सातारा येथे राहत्या घराच्या पाठीमागे आडोशाला तेथीलच उदय सूर्यकांत खंडझोडे याच्याकडून 450 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.


