दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वाई-मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध पिस्तूल जप्त केले आहे. यावेळी सातारा येथील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरला.
सातारा शहर परिसरातून दोन ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरल्या आहेत.
भूविकास बँकेशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
बेकायदा उत्खनन करण्यात आल्याप्रकरणी सातारा तहसील कार्यालय परिसरात कारवाई करुन आणलेला ६ लाख रुपये किंमतीचा जेसीबी चोरी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पिंपोडे गावात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला तरुणाने भोकसले होते. यामध्ये तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान संबंधित युवक स्वत: कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यानेही तणनाशक पिल्याची माहिती मिळत आहे.
देगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत शिवारातून अज्ञात चोरट्याने तिन एचपीची मोटर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील राजवाडा परिसरात असणार्या चौपाटी समोरील शौचालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चेतन भोसले, वय 28, रा. वनगळ, ता. सातारा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
करंजे, ता. सातारा येथील चोरी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडुन गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या टेम्पोसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.