सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चेतन भोसले, वय 28, रा. वनगळ, ता. सातारा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
सातारा : सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चेतन भोसले, वय 28, रा. वनगळ, ता. सातारा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मे 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान चेतन भोसले याने सातारा शहर परिसरात वास्तव्य करणार्या एका विधवा महिलेचा विधवा असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याशी बोलणे टाळले असता त्याने तिला माझे तुझे संबंध आहेत, ही माहिती लोकांना सांगून तुझी बदनामी करीन अशी धमकी देऊन तिला शिवीगाळ केल्याची तक्रार पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी चेतन भोसले याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.


