पिंपोडे गावात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला तरुणाने भोकसले होते. यामध्ये तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान संबंधित युवक स्वत: कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यानेही तणनाशक पिल्याची माहिती मिळत आहे.
कोरेगाव : पिंपोडे गावात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला तरुणाने भोकसले होते. यामध्ये तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान संबंधित युवक स्वत: कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यानेही तणनाशक पिल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत माहिती अशी, सातार्यातील पिंपोडे गावात एकतर्फी प्रेमातून एका युवकाने भर दिवसा तरुणीला भोकसले होते. संबंधीत तरुणीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बसस्थानक परिसरातील खासगी क्लासमध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला होता, मात्र काही वेळानंतर आरोपी निखिल राजेंद्र राजे (वय.26,रा. पिंपोडे बुद्रुक) हा कोरेगाव पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याने स्वत:ही तणनाशक पिल्याची माहिती मिळत आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
महिला दिनाच्या दोन दिवस अगोदरच अशी घटना साताऱ्यात घडली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी ही चाफळ, ता. पाटण येथे एकतर्फी प्रेमप्रकरणातून युवतीची हत्या झाली होती.


