maharashtra

तहसील कार्यालय परिसरातून जेसीबीची चोरी


Theft of JCB from tehsil office premises
बेकायदा उत्खनन करण्यात आल्याप्रकरणी सातारा तहसील कार्यालय परिसरात कारवाई करुन आणलेला ६ लाख रुपये किंमतीचा जेसीबी चोरी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सातारा : बेकायदा उत्खनन करण्यात आल्याप्रकरणी सातारा तहसील कार्यालय परिसरात कारवाई करुन आणलेला ६ लाख रुपये किंमतीचा जेसीबी चोरी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी मंडल अधिकारी प्रभाकर कुलकर्णी वय ४२, रा.सदरबझार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. ५ रोजी दुपारी ते रात्री यावेळेत घडली आहे. दरम्यान, पिवळ्या रंगाच्या या जेसीबीवर नंबर प्लेट नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पो.कॉ. ठोंबरे हे करत आहेत.