maharashtra

अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू


Woman injured in accident dies
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सातारा : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी कोडोली येथे मुलासोबत दुचाकीवरुन निघाल्यानंतर त्यावरुन पडून जखमी झालेल्या आशा प्रकाश जाधव (वय 55, रा.मंगळवार पेठ) यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.